"केंद्रीय प्राथमिक शाळा "
इतिहासाच्या पानातून .............
केंद्रीय प्राथमिक शाळेची संकल्पना सर्वप्रथम त्यावेळच्या मुंबई सरकारने स्थापन केलेल्या श्री .भिसे समितीने १९४८ साली मांडली होती .तसेच १९७० साली शासनाने सादर केलेल्या "महाराष्ट्रातील शिक्षणाच्या पुनर्रचनेसंबंधीचे धोरण " या पुस्तिकेतही केंद्रीय प्राथमिक शाळेच्या योजनेचा पुरस्कार करण्यात आला .वरील पार्श्वभूमीचा विचार करून जिल्हा परिषदांच्या सर्व प्राथमिक शाळांत सर्वांसाठी शिक्षणाचे सूक्ष्म नियोजन ,सतत उपस्थिती टिकवणे व शैक्षणिक दर्जा उंचावण्याकरिता महाराष्ट्रात ४८६० "केंद्रीय प्राथमिक शाळा " स्थापन करण्याचा निर्णय १४ नोव्हेंबर १९९४ साली घेण्यात आला .त्याकरिता १० जिल्हा परिषद शाळांसाठी एक या प्रमाणात स्वतंत्र केंद्रप्रमुख पदाची निर्मिती करण्यात आली .
**********************************************************************************************
**********************************************************************************************
आमच्या केंद्राविषयी .........
खेडगाव ..दिंडोरीच्या पूर्वेस साधारणतः १८ किमी वर असणारे एक गाव .पिंपळगाव
बसवंत -वणी रस्त्यावर पाराशरी या नदीच्या किनारी हे गाव वसले आहे .गावाला
समृद्ध असा शैक्षणिक ,सामाजिक व राजकीय वारसा लाभला आहे .नाशिक जिल्हा
परिषदेचे अध्यक्ष पद ,महिला व बालकल्याण समितीचे सभापतीपद ,दिंडोरी पंचायत समितीचे सभापती व उपसभापतीपद तसेच समाजकल्याण
विभागाचे सभापतीपद भूषविण्याचा मान गावातील मान्यवरांना मिळाला आहे .
शिवाय कृषीक्षेत्रातही हे गाव आघाडीवर आहे .कादवा सहकारी साखर कारखान्याचे
अध्यक्षपदही या गावाला लाभलेले आहे .शेती ,व्यापार अशा सर्वच बाबतीत
आघाडीवर असणारे हे गाव शैक्षणिक दृष्ट्याही आघाडीवर आहे .याच गावात समूह
साधन केंद्र खेडगाव अस्तित्वात आहे . जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खेडगाव ही
केंद्र शाळा असून परिसरातील बावीस शाळा खेडगाव केंद्राशी संलग्न करण्यात
आल्या आहेत . दळणवळणाची उत्तम सोय असल्याने सर्वांसाठीच सोयीचे हे ठिकाण
आहे . उज्ज्वल अशी शैक्षणिक परंपरा लाभलेले आमचे केंद्र आहे .
अंगणवाडीपासून ते पदवीपर्यंत शिक्षणाची सोय असणारे एक परिपूर्ण केंद्र
म्हणजेच खेडगाव केंद्र .नाशिक जिल्ह्याचे जवाहर नवोद्य विद्यालय ही याच
केंद्रात आहे .तेथील गुणवंत विध्यार्थ्यांचा आदर्श घेत केंद्रातील सर्वच
विद्यार्थी आपली शैक्षणिक प्रगती करत आहेत .
